मुंबई – बॉलिवूड इंडस्ट्रीमधील ड्रामा क्वीन ‘राखी सावंत’ आपल्या व्यक्तिगत आयुष्यात अनेक संकटनाचा सामना करतेय. राखीच्या सर्वात जवळची व्यक्ती अर्थात तिची आई सध्या एका जीवघेण्या आजाराशी झुंज देत आहे. यासंदर्भातील अनेक पोस्ट आणि व्हिडिओ सुद्धा राखीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. राखीच्या आईला आधीच कॅन्सर होता. आणि त्यानंतर आता ब्रेन ट्युमरसुद्धा झाला आहे. त्यामुळे आता राखी खूपच अस्वस्थ आहे. राखीची आई सध्या रुग्णालयातच असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, राखीच्या आईला जेव्हा कॅन्सर झाला होता त्यावेळी बॉलिवूड अभिनेता सलमान खानने तिला आर्थिक मदत केली होती. मात्र आता देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीने तिच्या आईच्या उपचारासाठी मदतीचा हात पुढे केल्याचं कळतंय. या संदर्भातील एक व्हिडिओ देखील सोशलवर व्हायरल झाला आहे.
View this post on Instagram
नुकतंच राखी हॉस्पिटल बाहेर पापाराझींसोबत संवाद साधत होती. त्यावेळी तिने अंबानी (मुकेश अंबानी) आईच्या उपचारात मदत करत आहेत असं सांगितलं. यावेळी बोलताना राखी म्हणाली, “माझी आई लोकांना ओळखू शकत नाहीये. ती खाऊ-पिऊही शकत नाहीये. तिला अर्धांगवायूचा झटका आला होता. मी मुकेश अंबानी यांचे आभार मानते. कारण त्यांनी आईच्या उपचारासाठी माझी मोठी मदत केली. आईच्या उपचाराचा खर्चसुद्धा त्यांनी कमी केला आहे.” असं राखीने सांगितलं.
तसेच ती पुढे म्हणाली, ‘माझ्या आईला कॅन्सर आहे आणि आता ब्रेन ट्युमरचंही निदान झालं आहे. तुम्ही कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा. माझ्या आईला प्रार्थनेची फार गरज आहे”, असं म्हणत ती ढसाढसा रडली होती. सध्या राखीच्या आईची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.