मुंबई – श्रीलंकेचा क्रिकेटपटू मुथय्या मुरलीधरन हा आपल्या खास फिरकीसाठी ओळखला जातो. मुथय्याच्या जोरावर श्रीलंकेने कित्येक मॅचेस जिंकल्या. त्याची बॉल पकडणायची शैली ते गुगली टाकण्याची स्टाईल भल्या भल्यांना घाम फोडत असे. जगातील महान गोलंदाजांपैकी एक असलेल्या मुथय्या मुरलीधरनचा हा करिष्मा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. मुरलीधरनच्या जीवनावर आधारित ‘800’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मुरली या नावाने प्रसिद्ध असलेला मुथय्या मुरलीधरन सोमवारी 51 वर्षांचा होत झाला. अशा परिस्थितीत त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर बनवलेल्या बायोपिकचे पहिले पोस्टर त्यांच्या चाहत्यांसाठी प्रसिद्ध करण्यात आले. मुरलीवर बनत असलेल्या चित्रपटाचे नाव ‘800’ असे आहे, जी त्याने घेतलेल्या कसोटी सामन्यातील विकेट्सची संख्या देखील आहे. एम एस श्रीपाठी लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता मधुर मित्तल मुथय्या मुरलीधरनची भूमिका साकारत आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटात मधुरने सलीमची महत्त्वाची भूमिका साकारली होती. मूळ तमिळमध्ये बनलेला हा चित्रपट हिंदी आणि तेलगूमध्येही प्रदर्शित होणार आहे.
श्रीलंकेचा करिष्माई गोलंदाज मुरलीधरन हा भारतीय राज्य तामिळनाडूशी संबंधित आहे. त्यांचे पूर्वज भारतीय होते ज्यांना ब्रिटिशांनी चहाच्या बागेत मजूर म्हणून काम करण्यासाठी श्रीलंकेत पाठवले होते. “’800′ हा चित्रपट केवळ मुरलीच्या क्रिकेट कारकिर्दीची कथा सांगत नाही, तर हा चित्रपट माणुसकीची देखील एक वेगळी कथा सांगतो असं दिग्दर्शक श्रीपती यांनी स्पष्ट केले आहे.
MUTHIAH MURALIDARAN BIOPIC: FIRST LOOK POSTER… WILL RELEASE IN 3 LANGUAGES… #MadhurrMittal – who won acclaim for his performance in the #Oscar-winning film #SlumdogMillionaire – will play legendary cricketer #MuthiahMuralidaran in his biopic, titled 800 [#800TheMovie].
Motion… pic.twitter.com/zCvfDHXJ0R
— taran adarsh (@taran_adarsh) April 17, 2023
‘स्लमडॉग मिलेनियर’ चित्रपटात सलीमची भूमिका साकारणारा अभिनेता मधुर मित्तल ‘800’ चित्रपटात मुरलीधरनची भूमिका साकारत आहे. तो म्हणतो, “मुरलीधरनसारख्या दिग्गजाची व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करणे ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. जरी आपण सर्वजण त्याला एक महान क्रिकेटर म्हणून ओळखतो, पण त्याचे जीवन आणि संघर्षांवर मात करण्याचा प्रवास इतका मनोरंजक आहे की. तो येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहील.