नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने राज्यसभेसाठी आपल्या 16 उमेदवारांच्या नावांची घोषणा आज केली. यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना कर्नाटकातून तर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना महाराष्ट्रातून उमेदवारी देण्यात आली आहे.
राजस्थानातून घनश्याम तिवारी यांना तर उत्तर प्रदेशातून लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी गोरखपूरची जागा सोडणारे राधामोहन आग्रवाल यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.
समाजवादी पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेले सुरेंद्र नागर तसेच बाबूराम निशाद, दर्शना सिंह आणि संगिता यादव यांच्याही नावांची घोषणा करण्यात आली आहे. दर्शना सिंह या भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत. उत्तराखंड येथून कल्पना सैनी, बिहारमधून सतीश चंद्र दुबे आणि शंभू शरण पटेल यांना तर हरियाणातून कृष्णलाल पवार व मध्य प्रदेशातून कविता पाटीदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कर्नाटकातून जग्गेश तर महाराष्ट्रातून अनिल बोंडे यांना तिकीट मिळाले आहे. सध्या झारखंड येथून राज्यसभेचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचे नाव यादीत नसल्याने त्यांचा पत्ता कट झाल्याचे मानले जाते आहे.