पुणे – कौटुंबिक पीडा दूर करण्याच्या आमिषाने महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबाला हडपसर पोलिसांनी अटक केली. या प्रकरणी एका महिले विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनंजय गोहाड उर्फ नाना (रा. मांजरी) असे अटक केलेल्या भोंदूचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचा मुलगा दिव्यांग आहे. त्याच्या प्रकृतीत तसेच पतीच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करण्यासाठी काही विधी करावे लागतील, असे आमिष आरोपींनी महिलेला दाखविले होते. एप्रिलमध्ये आरोपीने महिलेच्या शरीरातील नकारात्मक शक्ती बाहेर काढण्यासाटी अश्लील कृत्य केले.
या प्रकाराची माहिती कोणाला दिल्यास संसार उद्ध्वस्त होईल तसेच पती आणि भावाचा अपघात होईल अशी धमकी दिली. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे यांच्या मार्गदर्शनखाली तपास करण्यात येत आहे.