बॉलिवूडमध्ये नववर्षाचा शुभारंभही वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपटांनी होत आहे. यात दीपिकाचा “छपाक’ हा चित्रपट रिलीज झाला आहे. तर दुसरीकडे एका नव्या चित्रपटाचे पोस्टरही प्रदर्शित झाले आहे. पण या पोस्टर दिसणारा चेहरा हा अभिनेत्रीचा नसून बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्याचा आहे. या अभिनेत्याला ओळखणही कठीण झाले आहे. सध्या हा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नेहमीच काहीतरी हटके करण्यासाठी ओळखला जाणारा अभिनेता राजकुमार राव याचा नवा चित्रपट “लुडो’ या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला असून यात राजकुमार राव हिरव्या रंगाच्या लेहंग्यात दिसत आहे. पण या लुकमध्ये तो हुबेहुब आलिया भटसारखा दिसत आहे. त्यामुळे हे पोस्टर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. यात राजकुमार राव अतरंगी मुलगा आणि एका मुलीची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे.
राजकुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर “लुडो’चा पहिला लुक शेअर केला. ज्यात तो मुलीच्या गेटअपमध्ये खूप वेगळ्या लुकमध्ये दिसत आहे. त्याने हिरवा लेहंगा घातला आहे. मोकळ्या लांब केसांचा विग लावला आहे.
यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो की त्याने हा गेटअप कोणत्यातरी नाटकासाठी केला असवा. तर दुसरीकडे तो एका अतिशय अत्रंगी मुलाच्या लुकमध्ये दिसत आहे. त्याचा हा लुक रेट्रो आहे. 80च्या दशकातील हेअरस्टाइलमध्ये तो एखाद्या जुन्या अभिनेत्याप्रमाणे दिसत आहे.