टीव्ही मालिका “ये रिश्ता क्या कहलाता है’मधून सर्वांची मने जिंकणारी अभिनेत्री हिना खानने “कसौटी जिंदगी की 2’मध्ये तिची “संस्कारी बहू’वाली इमेज पुसून टाकली. या मालिकेत तिने साकारलेले कोमोलिका हे खलनायिकेचे पात्र विशेष गाजले. त्यानंतर आता हिना लवकरच वेब सीरिजच्या माध्यामातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “डॅमेज 2′ या वेब सीरिजमधून हिना डिजिटल डेब्यू करणार आहे. या वेब सीरिजमध्ये ती अभिनेता अध्ययन सुमनसोबत स्क्रिन शेअर करत आहे.
“डॅमेज 2′ ही एक सस्पेन्स थ्रिलर कथा आहे. ही वेब सीरिज हंगामा प्लेवर 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. यात हिना खान एका गेस्ट हाऊसच्या मालकीनीच्या भूमिकेत झळकणार आहे. वेब सीरिजच्या सुरुवातीला सर्व काही ठिक असते. मात्र नंतर अचानक घरातली एक लहान मुलगी गायब होते. या वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच लॉन्च झाला. ज्यात हिना खूपच वेगळ्या भूमिकेत दिसत आहे. पण ही वेब सीरिज मर्डर मिस्ट्री आहे की हॉरर स्टोरी हे अद्याप समजलेले नाही.
टीव्ही मालिका असो किंवा मग रिअलीटी शो हिनानं नेहमीच बेस्ट परफॉर्मन्स दिला आहे. या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्येही हिना खूपच बोल्ड आणि इंप्रेसिव्ह लुकमध्ये दिसत आहे. या वेब सीरिजच्या पहिल्या पार्टमध्ये मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर मुख्य भूमिकेत दिसली होती.