सुलेमानीला ठार करण्याचा आदेश देऊन अमेरिकेचे रक्षण केले
वॉशिंग्टन – इराणचा दुसऱ्या क्रमांकाचा लष्करी अधिकारी कासिम सुलेमानी याला ठार करण्याचा आदेश देऊन मी अमेरिकेचे रक्षण केले आहे. त्यामुळे आता मला शांततेचे नोबेल द्यायला हवे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या अशा काही वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता कासिम सुलेमानीला ठार केल्याचा मुद्दा ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उचलून धरत प्रचाराला सुरुवातही केली आहे. शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार मला आत्तापर्यंत मिळालेला नाही. इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना 2019 मध्ये शांततेचा नोबेल देऊन गौरवण्यात आले होते. हाच संदर्भ देऊन ट्रम्प म्हणाले की आता या पुरस्कारासाठी माझा विचार व्हायला हवा.
एकीकडे ट्रम्प यांनी सुलेमानीला ठार करण्याचे आदेश दिल्याबद्दल मला शांततेचे नोबेल द्या, अशी मागणी ट्रम्प यांनी केली असतानाच दुसरीकडे डेमोक्रॅटिक पक्षाने सुलेमानीला ठार करण्याचे आदेश दिल्याच्या निर्णयावरुन ट्रम्प यांच्यावर टीका केली.