राजकुमार रावची सोशल मीडियावर “छलांग’

बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री नुसरत भरुचा स्टारर “छलांग’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. राजकुमार राव याचा हा चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत होता.

हंसल मेहता दिग्दर्शित “छलंग’मध्ये एक युनिक सोशल कॉमेडी दाखविण्यात येत आहे, ज्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या तीन मिनिटांच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून यूट्यूबवर त्याला लाखो व्यूज मिळाले आहेत.

“छलांग’ ही रोमांस, ड्रामा आणि कॉमेडीचे मिश्रण असलेली एक साधीसरळ गोष्ट आहे. यात राजकुमार राव हा एका मॉंटू नामक व्यक्‍तीची भूमिका साकारत आहे, जो शाळेत क्रीडा शिक्षक असतो. मॉंटू त्याच्या इच्छेने शिक्षक बनत नाही, परंतु तो फक्‍त पैसे मिळविण्यासाठी ही नोकरी निवडतो.

 

View this post on Instagram

 

जीयो हँसो ख़ुश रहो और ख़ुशियाँ सबमें बाँटो।

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao) on

त्याच वेळी शाळेत संगणक शिक्षिका नीलूने (नुसरत भरुचा) प्रवेश केल्यावर त्याचे आयुष्य बदलते. मॉंटू नीलूवर प्रेम करतो आणि तिला प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो.

 

View this post on Instagram

 

Your heart and my heart are very, very old friends~ Rumi.

A post shared by RajKummar Rao (@rajkummar_rao) on

दरम्यान, चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. काही तासांतच तो 64 लाखांपेक्ष अधिक वेळा पाहिला गेला. हा चित्रपट ऍमेझॉन प्राइमवर 13 नोव्हेंबर म्हणजे दिवाळीनिमित्त प्रदर्शित करण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.