जान्हवी कपूर फोटोग्राफर्सवर चिडली

जान्हवी कपूर सध्याच्या सर्वात प्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या लूक, सौंदर्य, फॅशन स्टेटमेंट, चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करत आहे. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी हिने तिच्या कला आणि मेहनतीने स्वतःचा एक चाहतावर्ग निर्माण केला आहे. ती पुढे राजकुमार रावसोबत ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटात दिसणार आहे. अलीकडेच ती एका इव्हेंटमध्ये दिसली होती जिथे ती पापाराझींना वेगवेगळ्या एंगल तिचे फोटो काढू नका असे सांगत होती.
नुकतीच जान्हवी कपूरची एक क्लिप समोर आली, ज्यात ती तिच्या आगामी ‘मिस्टर अँड मिसेस माही’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त होती. यावेळी ती लाल बॅकलेस ड्रेसमध्ये नेहमीसारखीच सुंदर दिसत होती. क्लिपमध्ये, जान्हवी काही चाहत्यांसोबत सेल्फी घेताना दिसली.
अशात एका पापाराझीने तिचे फोटो काढताना चुकीचा ऍंगल क्लिक करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी म्हणाला, ‘ जान्हवीने कृपया चुकीचा अँगल घेऊ नका.’ असे संतापून सांगितले आहे.
अलीकडेच, जान्हवी कपूरने Airbnb सोबत भागीदारी करून, तिची आई श्रीदेवीच्या चेन्नईतील घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. याच कार्यक्रमादरम्यान, जान्हवीने पुन्हा मेमरी लेनमध्ये प्रवास केला आणि तिच्या बालपणातील तिच्या मजेदार कौटुंबिक सहलींचे किस्से आठवले.





