मुंबई (अक्षय भुजबळ ) – चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींचा सर्वसामान्यांच्या जीवनात अनेकदा परिणाम होताना दिसून येतो. खासकरून अभिनेते किंवा अभिनेत्री यांच्यामुळे अनेकदा कॉमन मॅनच्या आयुष्यात अनेक ट्रेंड सुरु झाल्याचे पाहायला मिळतात. अभिनेता जुना असो वा नको चाहत्यांना त्याची एखादी स्टाईल आवडली तर ती व्हायरल व्हायला वेळ लागत नाही. आज आपण अशाच काही कलाकारांविषयी माहिती करून घेणार आहोत ज्यांच्यामुळे हटके ट्रेंड सुरु झाले.
रजनीकांत
रजनीकांतने सिनेमाला भरपूर काही दिल. तस तर थलयवाच्या सर्वच स्टाईल सुपरहिट आहेत. परंतु रजनीकांतची एक स्टाईल आजही अनेकांना आवडते. ती म्हणजे हटके स्टाईलने सिगारेट तोंडात टाकून ओढण्याची. रजनीकांतच्या जुन्या चित्रपटांमध्ये अनेकदा रजनीकांत डाव्या हाताच्या तळहातावर सिगारेट ठेऊन ती उडवून थेट दोन ओठांच्यामध्ये पकडत असे. अनेकांना या स्टाईलची चांगलीच भुरळ पडली होती. आजही नवखा सिगारेट ओढणारा एकदातरी हा स्टायलिश ट्रेंड फॉलो केल्याशिवाय राहत नाही.
अक्षय कुमार
तस तर अभिनेता अक्षय कुमारच्या अनेक गोष्टी हिट आहेत. तो अनेकदा त्या गोष्टी चित्रपटात देखील कॅरी करताना दिसतो. जस अक्षय कुमार चित्रपटांच्या काही सीनमध्ये आपल्या डाव्या पायातील पॅंटचा भाग गुडघ्यापर्यंत फोल्ड करतो. हे असं चित्र त्यांच्या अनेक सिनेमांमध्ये दिसत. अक्षयने सुद्धा सर्वसामान्यांना एक ट्रेंड दिला आहे. हा ट्रेंड हेअर स्टाईलबाबतचा आहे. भूल भुलय्या,वेलकम अशा अनेक चित्रपटांमध्ये अक्षयने आपले केस मागील बाजूने ‘व्ही’ शेपमध्ये कट केलेले दिसून आले. मग काय सर्वसामान्यांनी देखील ही पद्धतीत कॉपी केली आणि हा एक ट्रेंड बनला.
करीना कपूर
सिनेसृष्टीच्या ट्रेंड सेटरच्या यादीत बॉलिवूडची बेबो देखील आघाडीवर आहे. बेबोने तर भल्या भल्या हिरोइन्स देखील पाणी पाजत बॉलिवूडमध्ये अनोखा ट्रेंड सुरु केला होता. हा ट्रेंड होता झिरो फिगरचा. हो बॉलिवूडमध्ये पहिल्यांदा करीना कपूरने आपल्या फिटनेसच्या जोरावर हा ट्रेंड सुरु करत अनेकांना घायाळ केलं होत. अक्षय कुमार,सैफ अली खान यांच्यासोबत आलेल्या ‘टशन’ या सिनेमात बेबो अक्षरशः झिरो फिगरमध्ये दिसली होती. यानंतर अनेक मॉडेल्स,टीव्ही अभिनेत्रींनीं या स्टाईलसाठी खूप मेहनत घेत लाईन लावली होती. परिणामी सर्वसामान्य देखील या ट्रेंडकडे चांगलेच आकर्षित झाल्याचे पाहायला मिळाले होते.
सलमान खान
सलमान खानने बॉलिवूड चित्रपटांना बरच काही दिल. शंभर कोटींचा क्लब देखील सलमानच्याच दबंग सिनेमापासून सुरु झाला. फॅशनबाबत बोलायचे तर स्क्रॅरी अर्थात फाटलेली जीन्स हा पॅटर्न सलमाननेच सुरु केल्याचं बोलल जात. सलमानने आपला ब्रँड बिंग ह्युमनच्या कॉश्यूम कलेक्शनमध्ये अशा स्टाईलिश पँटचे ब्रॅण्डिंग सुरु केले, ज्या गुडघ्यावर,मांडीवर,पाठीमागे स्टाईलमध्ये फाटलेल्या होत्या. सर्वसामान्यांसाठी ही स्टाईल सुरुवातीला काहीतरी हटके वाटणारी होती म्हणून अनेकांनी अशा पँट वापरायला सुरुवात केली आणि पुढे हाच एक आगळावेगळा ट्रेंड बनला.
आर माधवन
अभिनेता आर माधवनने अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. मात्र ‘रेहना है तेरे दिल मै’ वाला माधव शास्त्री सर्वांचाच खास होता. कॉलेज जीवन आणि प्रेम असे कथानक असलेला हा चित्रपट त्या वेळी चांगलाच गाजला होता. त्यासोबत गाजली होती या चित्रपटातील सर्व गाणी आणि माधवनची स्टाईल. त्याची फायटिंगची स्टाईल त्याची सिगारेट पेटवण्याची स्टाईल. माधवन या चित्रपटात एकाच हातात काडी आणि माचीस ठेवतो. एका हातातून दुसऱ्या हातात माचीस फेकून त्यावर काडी जाळून सिगारेट पेटवण्याची कला माधवनने चित्रपटात दाखवली खरी परंतु पुढे हाच ट्रेंड कित्येक कॉलेज तरुणांनी स्टाईल म्हणून फॉलो केल्याचे दिसून आले.
यो यो हनी सिंग
रॅपर यो यो हनी सिंग कोणाला माहिती नाही. सिंगिंगच्या सर्वोच्च शिखरावर असताना रिहाबमध्ये जावं लागल्याने हनी सिंग चांगलाच चर्चेत आला होता. मात्र हनी सिंगने देखील सर्वसामान्यांना एक ट्रेंड दिला. हातात माईक,मोठे गॉगल्स.. गळ्यात लॉकेट अशात स्टाईलमध्ये हनी रॅप करायचा. मोठे मोठे अभिनेते चित्रपटासाठी कोणती हेअरस्टाईल करावी या विचारात असायचे तेव्हा हनी मात्र डोक्याला साईड कट मारून गाणी गायचा. सर्वसामान्यांसाठी कदाचित हा मिल्ट्री कट होता परंतु याची सुरुवात मोठ्या प्रमाणात झाली ती हनी सिंगचे गाणे प्रसिद्ध झाल्यानंतरच.
संजय दत्त
अभिनेता संजय दत्त बद्दल काही वेगळं सांगायची गरज नाही. परंतु संजूबाबाने दिलेली एक स्टाईल अजरामर झाली आहे. आजही एखाद्याच्या गळ्यात मोठं सोन्याचं लॉकेट दिसलं तर समोरचा माणूस ‘पचास तोला’ काय ? असं विचारतो. अर्थात ही पचास तोला स्टाईल संजय दत्तच्या वास्तव चित्रपटापासून सुरु झाली हे सर्वांनाच माहिती आहे.