Rajasthan Elections 2023 : राजस्थान विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसा त्याठिकाणच्या प्रचाराला वेग येत आहे. दरम्यान, यासाठी नेतेमंडळी गाड्या आणि हेलिकॉप्टरचा (helicopter)मोठ्याप्रमाणात वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे याठिकाच्या खासगी हेलिकॉप्टरच्या भाड्यात मोठी वाढ होत आहे. निवडणूक प्रचारादरम्यान हेलिकॉप्टरची (helicopter) मागणी आणि तफावत लक्षात घेऊन कंपन्या सातत्याने भाडेवाढ करत आहेत.
25 नोव्हेंबरच्या निवडणुकीसाठी प्रचाराचा धुराळा उडत असताना, चार्टर दर दुप्पट आणि तिप्पट झाले आहेत. एका हेलिकॉप्टरच्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सहा महिन्यांपूर्वी प्रति तास एक लाख रुपये दराने उपलब्ध असलेली सिंगल इंजिन हेलिकॉप्टरची(helicopter) किंमत आता दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक आहे. त्याच वेळी, दुहेरी इंजिन असलेल्या हेलिकॉप्टरचे (helicopter)दर जवळपास दुप्पट वाढून 3-4 लाख रुपये झाले आहेत.
दरम्यान, जयपूरस्थित एका हेलिकॉप्टरच्या (helicopter)कंपनीचे सीईओनी, सिंगल-इंजिन आणि डबल-इंजिन अशा दोन्ही खासगी हेलिकॉप्टरची सप्टेंबरच्या मध्यात विक्री झाली होती. दरम्यान, काँग्रेस, भाजप किंवा आरएलपी (राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष) च्या नेत्यांना हेलिकॉप्टर भाड्याने घ्यायचे आहेत, परंतु आता आमच्याकडे हेलिकॉप्टर (helicopter) कमी आहेत. बहुतेक सिंगल-इंजिन हेलिकॉप्टर नोव्हेंबरपर्यंत विकले जातात. आता फक्त हेलिकॉप्टर प्रति तास 5 लाख रुपयांपेक्षा जास्त चार्टर दराने उपलब्ध असल्याचे म्हटले.
‘या’ नेत्यांनी हेलिकॉप्टर(helicopter) बुक केले
हेलिकॉप्टर (helicopter) कंपन्यांच्या अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत ज्या लोकांनी हेलिकॉप्टर (helicopter)बुक केले आहे, त्यापैकी बहुतेक असे नेते आहेत जे विशिष्ट जागेवरून निवडणूक लढवू शकतात. दुसरी श्रेणी पक्षांमध्ये महत्त्वाची पदे भूषविणाऱ्या आणि कमी कालावधीत राज्यभर फिरावे लागणाऱ्यांचा आहे. जयपूर विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरच्या (helicopter) गर्दीची पुष्टी केली आणि सांगितले की, सप्टेंबरपासून चार्टर्ड फ्लाइट्समध्ये वाढ झाली आहे. प्रत्यक्षात चार्टर्ड फ्लाइट्सची संख्या जुलैमध्ये ३९८ वरून ऑगस्टमध्ये ४४५ आणि सप्टेंबरमध्ये ९४५ झाली. तर, ऑक्टोबरमध्ये तो 1,500-2,000 एवढा आहे.