पुणे – पुणे येथील राजर्षि शाहू सहकारी बॅकेची 38 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने प्र.दि. उर्फ आबासाहेब शिंदे यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे झाली. आबासाहेब शिंदे यांनी 2020-21 या आर्थिक वर्षाच्या अहवाल वृत्तांताचे वाचन करताना सांगितले कि, 31 मार्च 2021 अखेर बॅकेच्या एकूण ठेवी रू.944 कोटींच्या असून, रू.568 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. एकूण व्यवसाय रू.1,512 कोटीचा झाला आहे.
बॅंकेचे ग्रॉस एनपीए चे प्रमाण 6.95% असून नेट एनपीअेचे प्रमाण 0.91% आहे. 31 मार्च 2021 अखेर बॅंकेस निव्वळ नफा रू.7 कोटी 02 लाख झाला आहे. 2020-2021 साठी सभासदांना 7% लाभांश जाहीर केला. कर्ज परतफेड नियमित करणाऱ्या कर्जदारांना व्याजदरात 1% रिबेट बॅंक देत आहे. बॅकेला स्थापनेपासून सतत ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे.
बॅंकेने सीबीएस – कोअर बॅकींग सिस्टीम अंतर्गत विविध सेवा सुविधा सुरू केल्या आहेत. सर्व शाखांमध्ये स्वत:ची एटीएम आहेत. मोबाईल बॅंकींग सुविधा सुरू केली आहे. बॅंकेला स्वत:चा आयएफएससी कोड मिळाला आहे. बॅंकेने नुकतीच युपीआयअंतर्गत गुगल पे/फोन पे व पेटीएम सेवा सुरू केल्या आहेत. बॅंकेने बाजीराव रोडलगत मुख्य कचेरी प्रशासकीय कामकाजासाठी इमारत खरेदी केली असून सदर इमारतीचे काम सुरू आहे.
या सभेत इयत्ता 10 वी व 12 वीच्या परीक्षेत 80% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या सभासदांच्या गुणवंत पाल्यांचे अभिनंदन करण्यात आले. सभासदांचे स्वागत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश लक्ष्मण पासलकर, आभार प्रदर्शन बॅंकेचे उपाध्यक्ष सुधाकर पन्हाळे व सूत्र संचालन रमेश रामभाऊ सुतार यांनी केले.