मुंबई – आज क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या मास्टर ब्लास्टर ‘सचिन तेंडुलकर’चा आज 50 वा वाढदिवस आहे. अनेक ठिकाणी सचिनचा वाढदिवस साजरा केला जात असून, त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील होताना दिसत आहे. अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळून सचिनला आता जवळपास दहा वर्षे होत आहेत तरीही त्याच्या नावाची जादू अद्याप कायम आहे.
आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचा शतक झळकावणारा सचिन तेंडुलकर एकमेव फलंदाज आहे. त्याच्या क्रिकेटमधील याच विक्रमी कामगिरीमुळे त्याला ‘क्रिकेटचा देव’ म्हणूनही ओळख जातं.
दरम्यान, आपल्या लाडक्या मित्राला म्हणजेच, सचिन तेंडुलकरला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरेंनी सोशल मीडियावर एक भली मोठी पोस्ट शेअर करत आपल्या मनातली भावना व्यक्त केल्या आहेत.
राज ठाकरे आपल्या पोस्ट मध्ये म्हणतात की…,
“सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. ह्या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन.
सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. ह्या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय… pic.twitter.com/ns9MW4irkM
— Raj Thackeray (@RajThackeray) April 24, 2023
आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिनने शतक ठोकलंच पाहिजे अशी कायमच इच्छा किंवा अपेक्षा असते, ही इच्छा/अपेक्षा सचिन तू पूर्ण करशीलच…!’ या आशयाची पोस्ट राज ठाकरेंनी लिहली आहे.