बेंगळुरू/नवी दिल्ली – कन्नड टीव्ही अभिनेता संपत जे राम शनिवारी बेंगळुरूच्या नेलमंगला येथे त्याच्या घरी मृतावस्थेत आढळून आला. तो 35 वर्षांचा होता. या अभिनेत्याने ‘अग्निसाक्षी’ आणि ‘श्री बालाजी फोटो स्टुडिओ’ यासारख्या अनेक टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.
संपत जे रामचा मित्र राजेश ध्रुव, जो एक अभिनेता आहे, त्याने फेसबुक पोस्टमध्ये संपतच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कन्नडमधून भाषांतरित केलेल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, “तुमचा विरह सहन करण्याची ताकद आमच्यात नाही. अजून बरेच चित्रपट बनायचे आहेत. तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्यासाठी अजून भरपूर वेळ आहे. आम्हाला तुम्हाला अजून पहायचे आहे. कृपया परत या.
संपत राम पुरेसे काम न मिळाल्याने नाराज होते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. संपत रामचा अग्निसाक्षी सह-कलाकार विजय सुरिया म्हणाला की हा गुणी अभिनेता चांगल्या ऑफरची वाट पाहत होता. त्याच्या आयुष्यात असे काही घडेल अशी मला अपेक्षा नव्हती. तो एक अभिनेता म्हणून चांगल्या संधीची वाट पाहत होता. त्याला त्याच्या कारकिर्दीत उंची वाढवायची होती आणि तो खूप महत्वाकांक्षी होता.
संपत रामच्या पार्थिवावर त्यांच्या जन्मगावी एनआर पुरा येथे रविवारी उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.