मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल ठाण्यात उत्तर सभा घेतली. यासभेदम्यान ठाकरे यांनी तलवार हातात घेऊन ती उंचावली होती त्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावर ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय मनसे नेते अविनाश जाधव आणि रविंद्र मोरे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे ठाण्यातील मनसेची उत्तरसभा अंगलट आल्याचे यावरून दिसून येत आहे.
उत्तरसभेआधी कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचा सत्कार केला. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली तलवार राज ठाकरे यांनी उंचावली होती.याप्रकरणी त्यांच्यावर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या भाषणात काही आक्षेपार्ह आढळल्यास याप्रकरणीही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.