“राज साहेब राजा माणूस”; केदार शिंदेंसह अनेक कलाकारांकडून राज ठाकरेंना शुभेच्छा

मुंबई –  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ‘राज ठाकरे’ यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी दरवर्षी त्यांच्या ‘कृष्णकुंज’ निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या रांगा लागत.

परंतु करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मागील वर्षीप्रमाणे यंदाही वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना सिनेसृष्टीतील अनेक दिग्ज कलाकारांनी राज यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

यामध्ये अभिनेता ‘रितेश देशमुख’ आणि चित्रपट दिग्दर्शक केदार शिंदे यांचा समावेश आहे. या दोघांनीही सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

रितेश देशमुख म्हणाला…

माय मराठीवर जीवापाड प्रेम करणारे, मराठी माणसाच्या आणि महाराष्ट्राच्या हिताचा सदैव विचार करणारे, युवकांचे प्रेरणा स्थान आणि माझे मित्र राज ठाकरे जी आपणास वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपल्याला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच मनोकामना.

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

काय म्हणाले केदार शिंदे?

ते राजकीय नेते म्हणून कसे आहेत? याविषयी लिहायला त्यातला मी माहीर नाही. पण एक कलावंत आणि मित्र म्हणून एका वाक्यात लिहू शकतो. तो राजा माणूस आहे. तासनतास त्यांच्याशी कलाकार म्हणून संवाद साधू शकतो, त्यांच्याकडे जी माहिती आहे ती आत्मसात करणं फार अवघड आहे.

संगीत चित्रपट या दोन क्षेत्रातला त्यांच्या तोडीचा माहितगार दुसरा कोणी मी पाहिला नाही. मैत्री करावी तर या राजा माणसाशी. सतत लक्ष असतं त्यांचं.. सतत संपर्कात असतात. वाढदिवस साजरा करून वय वाढत, पण राजसाहेब यंग ॲन्ड डायनॅमिक आहेत.

या कोरोनाच्या कठिण परीस्थिती मधे हा एकमेव राजकीय नेता होता, ज्याने कितीही विरोधात असला तरी त्याची राजकीय पोळी भाजली नाही. हे आपल्याला सतत जाणवलय. मान्य करायालाच हवं.

एकच वाटतं की, त्यांना त्यांच्या राजकीय क्षेत्रात अजून तशी संधी मिळाली नाही. त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र हा फार वेगळा आहे. एकदम 70mm. आपण इतक्या लोकांना संधी दिली. काहींना न देता गोळाबेरीज करून त्यांनी आपली आपणच मिळवली.

एकदा या राजा माणसाच्या हाती महाराष्ट्र राज्य देऊ. नक्कीच आपल्यावर “राज्य” येणार नाही, याची ते काळजी घेतील. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हे गीफ्ट येत्या निवडणुकीत मनसे मतदान करून देऊ. मला खात्री आहे, बाळासाहेब ठाकरे यांना मनोमन मानणारे राजसाहेब आपल्या अपेक्षा नक्कीच पुर्ण करतील.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.