‘राज कुंद्रा भला माणूस, अ‍ॅपही फारच सिंपल’ मीका सिंहने दिला पाठिंबा

मुंबई – उद्योजक आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्न फिल्म चित्रीकरण करुन विकल्याच्या आरोपावरुन मुंबई पोलीस गुन्हे शाखेने अटक केली आहे. मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राची चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली.

राज कुंद्राच्या अटकेनंतर बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींनी संताप व्यक्त केला आहे. राज कुंद्राच्या समर्थनार्थ काही  बॉलीवूड सेलेब्सने या मुद्यावरून सोशल मीडियावर आपलं  मत व्यक्त केलं आहे.  यातच आता बॉलीवूड गायक  मीका सिंह याने  यावर आपलं मत व्यक्त केलं आहे. ‘मी अ‍ॅप बघितलंय, फार काही नव्हतं’ असं म्हणत त्याने राज कुंद्राला पाठिंबा दिला आहे.

मुंबईत मीका सिंहने पापीरॉजीशी बोलतांना सांगितले,’ राज कुंद्रा भला माणूस आहे, ते एक अ‍ॅप बघितलंय, त्यात फार काहीच नाही. ते  सिंपल अ‍ॅप होते ते पुढे म्हणाले, अ‍ॅपसंदर्भात मला फारसे माहीत नाही. मात्र मला असं वाटते आहे की यात त्याच दोष नाही, या प्रकरणात आता न्यायालयच सांगू शकते सत्य काय आणि असत्य काय? ‘ असं म्हणत त्यांनी या प्रकरणांवर आपलं मत व्यक्त केलं आहे.

मात्र राज कुंद्रा याला यापूर्वी अनेक प्रकरणात यापूर्वीही ते अशाप्रकारच्या वादात सापडलेले आहेत.  यातच इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, 

– राज कुंद्रा यांचे नाव याआधी आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणातही समोर आले होते. त्यांना हयात असेपर्यंत क्रिकेटपासून दूर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. तर राजस्थान रॉयल्सचे ते सहमालक होते मात्र या संघावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

– २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावलं होतं. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता.

– बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने २०१८ साली समन्स बजावले होते. २ हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचं सांगण्यात आलेलं. समन्स जारी केल्यानंतर ५ जून २०१८ रोजी राज कुंद्रांनी इडीचे कार्यालय गाठले होते.

– २०१७ मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंद्रांचे नाव चर्चेत आले होते. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.