मुंबई – बॉलीवूड अभिनेता राजकुमार राव सध्या ‘गन्स अँड रोझेस’मुळे चर्चेत आहे. त्याने आतापर्यंत आपल्या अनेक पात्रांनी प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. त्याने ‘अलिगढ’, ‘काई पो चे’, ‘शाहिद’, ‘ट्रॅप्ड’ आणि इतर अनेक चित्रपटांमध्ये रंजक भूमिका साकारल्या आहेत. 2017 च्या ‘बोस: डेड ऑर अलाइव्ह’ या वेबसिरीजमध्ये त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भूमिका साकारली होती. आता अभिनेता आगामी प्रोजेक्टसाठी भारतीय स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राज कुमार रावने याबाबत खुलासा केला आहे.
अलीकडेच एका मुलाखतीत, अभिनेत्याने स्पष्टपणे सांगितले की तो त्याच्या आगामी प्रोजेक्टमध्ये भगतसिंगची भूमिका साकारणार आहे. तो म्हणाला, ‘नक्कीच, मला भगतसिंग आणि त्यांच्या प्रवासाबद्दल खूप आवड आहे आणि तुम्ही आतापर्यंत जे पाहिले आहे त्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने त्यांना पडद्यावर सादर करणे, हे देखील खूप मेहनतीचे आहे. एक अभिनेता म्हणून त्याची भूमिका साकारणे माझ्यासाठी खूप वेगळे असेल.म्हणूनच मी त्यांना वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत करू इच्छित आहे असं देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
2017 मध्ये सुभाषचंद्र बोस यांची व्यक्तिरेखा चमकदारपणे साकारल्यानंतर आता राजकुमार राव पडद्यावर भगतसिंग यांची व्यक्तिरेखा साकारण्याच्या तयारीत आहे. राजकुमार राव त्याच्या नवीन प्रकल्पाबद्दल खूप उत्साहित आहे आणि स्क्रिप्टिंगमध्ये स्वतः सक्रिय भाग घेत आहे. हा प्रकल्प अजूनही अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर आहे, जिथे लेखकांची टीम सध्या भगतसिंग यांच्या जीवनातील कथांवर संशोधन आणि लेखन करण्यात व्यस्त आहे.
हा प्रोजेक्ट OTT वर आणला जाईल. त्यानुसार तयार करण्यात येत आहे. या टीमला भगतसिंग यांच्यावर या पूर्वी कधीच दिसली नाही अशी सामग्री तयार करायची आहे. सध्या हा प्रोजेक्ट अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि लेखनालाच सहा ते आठ महिने लागणार आहेत. परंतु राजकुमाराने याबाबत वक्तव्य केल्याने त्याच्या या भूमिकेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
दुसरीकडे, अभिनेत्याच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, राजकुमार राव अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत ‘स्त्री 2’ च्या शूटिंगला सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. 2018 च्या यशस्वी हॉरर कॉमेडीचा सिक्वेल निर्माता दिनेश विजन यांनी या वर्षी एप्रिलमध्ये घोषित केला होता.