नगर, (प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केल्या प्रमाणे मराठा आरक्षण या विषयावर दि १५ फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन होत आहे. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत सगेसोयरे या शब्दाच्या व्याख्याबाबत जी अधिसूचना काढलेली आहे. ती लागू करून घटनेत पारित करावी, यासाठी अधिवेशनामध्ये आवाज उठवावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाज यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी गजेंद्र दांगट, राम जरांगे, विलास तळेकर, अभय शेंडगे, महेश घावटे, रावसाहेब काळे, दत्ता वामन, गिरीश भामरे, सुधीर दुसुंगे, अशोक डम, परमेश्वर पाटील, संदीप जगताप, सोमनाथ गुंड, संचित निकम, बाबासाहेब रोहोकले आदी उपस्थित होते. या वेळी आ. संग्राम जगताप यांनी विधानसभेत प्रश्न मांडणारअसल्याचे आश्वासन दिले.