चेन्नई – चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम या जिल्ह्यांसह तमिळनाडूच्या अन्य भागाला मुसळधार पावसाने झोडपले आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने शनिवारी किमान 12 जिल्ह्यांमध्ये आणखी पावसाचा इशारा दिला आहे. काल रात्रभर पडलेल्या पावसाने अनेक भागात अचानक पाणी साचले. मेघगर्जनेचा आवाज आणि विजेचा लखलखाट असे वातावरण राज्याच्या अनेक भागात होते.
चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर, कांचीपुरम,विल्लुपुरम आणि कुड्डालोर,पुडुचेरी या भागात जोरदार पावसाची नोंद झाली. चेन्नई शहरात काल रात्रीत ४५.२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली.
हवामान खात्याने म्हटले आहे की, 26 नोव्हेंबरच्या सुमारास दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे आणि ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे आणि 27 नोव्हेंबर रोजी आग्नेय बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यमुळे धिकाऱ्यांनी चेन्नई, चेंगलपट्टू, तिरुवल्लूर आणि कांचीपुरम जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.