नगर -शहरातील झेंडीगेट परिसरात सुरू असलेल्या कत्तलखान्यावर कोतवाली पोलिसांनी शुक्रवार (दि. 1) छापा टाकून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.त्यांच्याकडून 56 हजार रुपये किमतीचे गोवंशीय जनावरांचे मांस, 500 रुपये किमतीचे दोन चाकू व सत्तूर असा 56 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपी जिशान आयाज कुरेशी (वय 25), सोफियान आयाज कुरेशी (वय 23), सलीम फयाज कुरेशी (वय 26) व शान माजिद कुरेशी (वय 18, सर्व रा. सुभेदार गल्ली, झेंडीगेट) यांच्यावर या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झेंडीगेट भागातील आर. आर. बेकरीमागे गोवंशीय जनावरांची कत्तल सुरू असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक विकास वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. त्यानुसार