नवी दिल्ली : कर्नाटकातून दिल्लीत परतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी वेगळ्याच स्टाईलमध्ये दिसले. मंगळवारी राहुल गांधी प्रथम सीपी (कॅनॉट प्लेस) जवळील बंगाली मार्केटमध्ये पोहोचले. यानंतर ते जुन्या दिल्लीलाही गेले. त्यांनी बंगाली मार्केटमध्ये पाणी पुरीचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर राहुल गांधी जुन्या दिल्लीच्या मटिया महल मार्केटमध्ये टरबूज पासून बनवल्या जाणारे शरबत-ए-मोहब्बत पिले. यावेळी त्यांना पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
मोहब्बत की शरबत ❤️ pic.twitter.com/3qLQAaf6oF
— Congress (@INCIndia) April 18, 2023
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला त्यांच्यामध्ये पाहून जनतेच्या आनंदाला पारावार उरला नाही. बंगाली मार्केटमध्ये मोठ्या संख्येने लोक त्याच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न करताना दिसले, पण तिथे उपस्थित असलेल्या सर्वांना ही संधी मिळू शकली नाही. बंगाली बाजारानंतर राहुल गांधी जुन्या दिल्लीतील मटिया महल बाजारातही गेले. येथे राहुल गांधी एका शरबत दुकानात टरबूज चाखताना दिसले. यादरम्यान त्यांना पाहण्यासाठी लोकांची गर्दी झाली होती.