नवी दिल्ली – आयपीएल 2023 च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 14 धावांनी पराभव केला. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी 20 धावांची गरज होती. अशा स्थितीत रोहित शर्माने अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी दिली. शेवटच्या षटकात अब्दुल समद क्रीजवर होता, जो तुफानी पद्धतीने फटके मारण्यासाठी ओळखला जातो.अर्जुनने देखील आपला करिष्मा दाखवत रोहितचा विश्वास कायम ठेवला आणि स्वतःला सिद्ध करत मुंबईला विजय मिळवून दिला.
अर्जुन तेंडुलकर गोलंदाजीसाठी आला तेव्हा सचिन तेंडुलकर मुंबईच्या ड्रेसिंग रूममधून सामना पाहत होता. यावेळी अर्जुन काय करणार याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचा लक्ष लागलं होत. पहिला बॉल डॉट गेला तर दुसऱ्या बॉल अब्दुल समद रणआऊट झाला. त्यानंतर एक बॉल वैद्य गेला तर पुढच्याच बॉलवर दोन रन्स हैदराबादला मिळाले. चौथ्या बॉलवर लेगबाईजचा एक रण हैदराबादला मिळाला. बॉलप्रमाणे मॅचमध्ये सस्पेन्स वाढत चालला होता. नवख्या अर्जुनला रोहितने निर्णायक ओव्हर दिल्याने सर्वजण कटाक्षाने मॅच पाहत होते.
अर्जुनच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारने एक्स्ट्रा कव्हरवर शॉट मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू हवेत होता. रोहित शर्माने चेंडू झेलला. यानंतर रोहितने अर्जुनकडे बोट दाखवून आनंद साजरा केला.अर्जुनची आयपीएलमधील ही पहिली विकेट होती. ड्रेसिंग फॉर्ममध्ये बसलेला सचिनही आनंदाने उभा राहिला. जवळच बसलेल्या पियुष चावलाने सचिनला मिठी मारली. त्याचवेळी मैदानावर सर्व खेळाडू अर्जुनचे अभिनंदन करू लागले.
A special moment for young Arjun Tendulkar, who gets his first wicket in #TATAIPL and it is his captain Rohit Sharma, who takes the catch of Bhuvneshwar Kumar.
Arjun takes the final wicket and @mipaltan win by 14 runs. pic.twitter.com/1jAa2kBm0Z
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2023
रवी शास्त्रींची कॉमेंट्री चाहत्यांचे पुन्हा एकदा मनोरंजन करत होती. अर्जुनच्या डोळ्यात भावना स्पष्ट दिसत होत्या. पण त्याने आपले अश्रू पडू दिले नाहीत. निर्णायक क्षणी अर्जुनने जिगरबाज खेळी करत स्वतःला सिद्ध करून मुंबईला विजय मिळवून दिला.