Rahul Gandhi – ऑस्ट्रेलियाने आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 (india vs australia world cup 2023) चे विजेतेपद पटकावले आहे. 19 नोव्हेंबर (रविवार) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा सहा गडी राखून पराभव केला.
या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला (india vs australia) जिंकण्यासाठी 241 धावांचे लक्ष्य दिले होते, जे पॅट कमिन्सच्या संघाने 43 षटकात पूर्ण केले. ऑस्ट्रेलियन संघ 50 षटकांच्या क्रिकेटमध्ये सहाव्यांदा चॅम्पियन बनला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर झालेला सामना पाहण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे स्वतः उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्यावर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी टीका केली आहे.
पनौती 😉 pic.twitter.com/kVTgt0ZCTs
— Congress (@INCIndia) November 21, 2023
ते राजस्थानमधील एका प्रचारसभेत बोलत होते. यावेळी बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले की, “पीए मोदी म्हणजे पनौती मोदी, ते सामना पाहायला गेले आणि भारतीय संघ हरला.
आपला संघ चांगली कामगिरी करत होता, पण पनौती तिकडे गेले आणि भारतीय संघाला हरवलं’. अशी जळजळीत टीका राहुल गांधींनी केली आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटवर अकाउंटवर राहुल गांधींचा हा व्हिडिओ देखील पोस्ट करण्यात आहे.