राफेल प्रकरणी न्यायालयाचा केंद्र सरकारला ‘सर्वोच्च’ दिलासा 

नवी दिल्ली – राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत. याप्रकरणात पुनर्तपासाची गरज नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. यामुळे केंद्र सरकरला मोठा दिलासा दिला आहे.

राफेल प्रकरणी पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने १० मे रोजी आपला निर्णय राखून ठेवला होता. सुनावणीदरम्यान याचिकाकर्ता प्रशांत भूषण, माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी आणि इतरांनी राफेल खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने राफेल ही देशाची गरज असल्याचे सांगून या याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली होती. यावर आज आता सरन्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने निर्णय दिला आहे.

दरम्यान, फ्रान्स आणि भारतात झालेल्या करारानुसार एकूण 36 विमाने भारताला मिळणार आहे. त्यापैकी मे 2020 पर्यंत 4 राफेलची विमाने भारताकडे सूपूर्त करण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये आता भारतीय वायूसेनेतील अधिकाऱ्यांना हे विमान चालवण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे यासाठी काही कालावधी लागणार आहे, त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये भारतात या विमानाचे उड्डाण करण्यात येणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here