Asian Wrestling Championship 2024 : भारताचा 19 वर्षीय कुस्तीपटू उदित याने गुरुवारी किर्गिस्तानमधील बिश्केक येथे झालेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले. तर अभिमन्यू (70 किलो) आणि विकी (97 किलो) यांनीही आपापल्या वजन गटात कांस्यपदके जिंकून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताच्या पदकांची संख्या तीनवर नेली.
अखिल पुरुषांच्या फ्रीस्टाइल विभागात गुरुवारी किमान पाच भारतीय कुस्तीपटूनी सहभाग नोंदवला. त्यापैकी रोहित (67 किलो) आणि परविंदर सिंग (79 किलो) यांनीही स्पर्धा केली, परंतु त्यांना पदक मिळवण्यात अपयश आले.
20 वर्षांखालील आशियाई चॅम्पियन उदितने पात्रता फेरीत इराणच्या इब्राहिम महदी खारीचा 10-8 असा, उपांत्यपूर्व फेरीत किरगिझस्तानच्या अल्माझ स्मानबेकोव्हचा 6-4 असा पराभव केला आणि उपांत्य फेरीत कोरियाच्या किम कुम ह्योकचा 4-3 ने पराभव करत केला होता. मात्र, अंतिम फेरीत जपानच्या केंटो युमियाने 5-4 असा विजय मिळवला आणि उदितला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
अन्य सामन्यात, अभिमन्यूने कांस्यपदकाच्या लढतीत उझबेकिस्तानच्या बेगिजॉन कुलदाशेवचा 6-5 असा पराभव केला तर विकीने किर्गिस्तानच्या आंद्रेई अरोनोवचा 10-1 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले. रोहितने 65 किलो वजनी गटात कांस्यपदकाच्या लढतीत प्रवेश केला, पण त्याला जपानच्या मासानोसुके ओनोने 5-3 ने पराभूत केले. परविंदर सिंग (79 किलो) याला पात्रता फेरीत जपानच्या र्युनोसुके कामियाकडून 3-0 असा पराभव पत्करावा लागला.