सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या पुष्पा या चित्रपटातील ‘झुकेगा नही साला’ डायलॉग ने फक्त प्रेक्षकांनाच नाही तर अनेक दिग्गजांना देखील वेड लावलं होतं. त्यातलाच एक दिग्गज म्हणजे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हि़ड वॉर्नर हा आहे. अल्लू अर्जुनने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी ‘पुष्पा २’ या चित्रपटाचे पोस्टर आणि टिझर रिलीज करून प्रेक्षकांना सरप्राईज दिलं आहे.
अशातच डेव्हिड वॉर्नर आणि त्याची मुलगी इस्लाने अल्लू अर्जुनला वाढदिवसानिमित्त खास पुष्पा स्टाइलमध्ये शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचा व्हिडिओ वॉर्नरने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
काय आहे व्हिडीओमध्ये-
“हॅपी बर्थडे पुष्पा” असं म्हणत वॉर्नर आणि लेक इस्ला या दोघांनीही अल्लू अर्जुनला शुभेच्छा दिल्या आहेत. झुकेगा नही सालाची स्टेप करत “आम्ही ‘पुष्पा २’ची वाट पाहत आहोत,” असं वॉर्नरने म्हटलं आहे. वॉर्नरने हा व्हिडीओ शेअर करत लेक इस्ला अल्लू अर्जुनची चाहती आहे, असेही म्हटलं आहे.
View this post on Instagram