पुणे – दसऱ्याच्या मुहुर्तावर यंदा पुणेकरांनी 9 हजार 974 वाहनांची खरेदी केली. यात 5 हजार 578 दुचाकी तर 2 हजार 910 चारचाकींचा समावेश आहे. दरम्यान, 669 ई-वाहनांची देखील पुणेकरांनी खरेदी केली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.
यंदा दसऱ्याच्या आदल्या दिवशीपर्यंत वाहनांची खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. दि. 15 ते 23 ऑक्टोबर 2023 या आठ दिवसांच्या कालावधीत पुणे आरटीओ कार्यालयात वाहनांच्या नोंदणीचे काम सुरू होते. गेल्या वर्षी दि.27 नोव्हेंबर ते 4 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 9 हजार 812 वाहनांची खरेदी केली होती, असे “आरटीओ’ने सांगितले.