पंजाब नॅशनल बॅंकेला 4,750 कोटींचा तोटा

नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बॅंकेला चौथ्या तिमाहीत 4,750 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. हा तोटा गेल्या वर्षातील चौथ्या तिमाहीतील 13,417 कोटी रुपयांच्या तोट्यापेक्षा 65 टक्‍क्‍यांनी कमी असल्याचे बॅंकेने म्हटले आहे.
बॅंकेने खराब कर्ज वसुलीसाठी पुढाकार घेतला आहे. त्याचबरोबर न वसूल होत असलेल्या कर्जापोटी मोठी तरतूद केली आहे. त्यामुळे बॅंकेला तोट्याला सामोरे जावे लागत आहे. मात्र तरीही तोटा बराच आटोक्‍यात आला आहे. आगामी काळात बॅंकेची परिस्थिती आणखी सुधारेल असे बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक सुनील मेहता यांनी सांगितले.

चौथ्या तिमाहीत बॅंकेचा कार्यचांलन नफा 2861 कोटी रुपये झाला आहे. तर सरलेल्या वर्षाचा कार्यचालन नफा 12,995 कोटी रुपये आहे. मात्र, बॅंकेला अधिक तरतूद करावी लागली असल्यामुळे बॅंकेच्या निव्वळ नफ्यामध्ये घट झाली आहे असे त्यांनी सांगितले. बॅंकेचे स्थूल एनपीए सध्या 15.50 टक्के आहे. गेल्या वर्षी या काळात हे 18.38 टक्के होते, असे त्यानी पत्रकारांना सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)