चंदीगड : पंजाब राज्याचे आरोग्य मंत्री बलबीर सिंह सिद्धू कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. विशेष म्हणजे बलबीर सिद्धू सोमवारी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत संगरूर येथे झालेल्या ट्रॅक्टर रॅलीत सहभागी झाले होते. या रॅलीत राज्याचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, पंजाब काँग्रेसचे प्रमुख सुनील जाखड, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्यासह अनेक मोठे नेते सहभागी होते.
राहुल यांच्या रॅली दरम्यान बलबीर सिध्दू यांनी ‘शेती वाचवा’ कार्यक्रमात स्टेज सेक्रेटरी म्हणून जबाबदारी पाहिली होती. या दरम्यान ते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्याही संपर्कात आले होते.
Punjab Health Minister Balbir Sidhu (file pic) tests positive for #COVID19: Health Minister’s Office pic.twitter.com/ZY756Q4GNE
— ANI (@ANI) October 6, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्याने त्यांनी स्वत:ला आपल्या घरातच आयसोलेट करून घेतले आहे. दरम्यान, आज (मंगळवारी) सकाळी आरोग्य मंत्री बलबीर सिद्धू यांना प्रकृती अस्वास्थ्य आढळून आलं. त्यांना ताप तसंच अंगदुखीसारखी कोरोनाची लक्षणंही जाणवली. त्यानंतर त्यांनी स्वत:ची चाचणी करवून घेतली आणि त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यामुळे ‘करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या बलबीर सिद्धू यांच्या संपर्कात आलेल्या लोकांचीही कोरोना चाचणी करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.