देवगण कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर; अजयने ट्विट करत दिली माहिती

मुंबई – कोरोना काळात आपण अनेक अभिनेत्यांना गमावलं. त्यात आता पून्हा एका दिग्दर्शकाची भर पडली आहे. अभिनेता अजय देवगणचा भाऊ दिग्दर्शक अनिल देवगणचा  मृत्यू झाला आहे. अजय देवगनने आपल्या सोशल मीडियावर आपल्या भावाच्या मृत्यूची बातमी दिली आहे.

अजय देवगणने आपला भाऊ अनिलचं निधन झाल्याचं ट्वीट केलं आहे. काल रात्री आपल्या भावाचं निधन झालं. त्याच्या अशा अचानक जाण्याने आम्हा सर्वांनाच धक्का बसला आहे असं अजय देवगण म्हणाला.

 

Image

दरम्यान, अजय देवगण यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनिल देवगण हा प्रसिद्ध दिग्दर्शक होता. त्याने राजू चाचा, ब्लॅकमेल, हाल ए दिल अशा फिल्मचं दिग्दर्शक केलं आहे. तसंच सन ऑफ सरदार फिल्ममध्ये तो क्रिएटिव्ह डायरेक्टर होता. अनिलने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून करिअरला सुरुवात केली. फूल और काँटे, प्यार तो होना ही था अशा फिल्मसाठी तो सहाय्यक दिग्दर्शक होता

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.