लुधियाना – लुधियाना कोर्ट कॉम्प्लेक्सच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये आज गुरुवारी दुपारी मोठा स्फोट झाला आहे. स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूचा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. सध्या या स्फोटात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून, कोर्टाची संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आली आहे.
Punjab | Explosion in Ludhiana District Court Complex, several feared injured
Details awaited.
— ANI (@ANI) December 23, 2021
अन्य कुठे बॉम्ब प्लांट केला आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. उपायुक्तांच्या सूचनेनुसार लुधियाना जिल्हा प्रशासकीय संकुल पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
मुख्यमंत्री चरणजीत चन्नी थोड्याच वेळात लुधियानाकडे रवाना झाले आहेत. ते म्हणाले की मी लुधियानाला जात आहे. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने काही देशद्रोही अशा कारवाया करत आहेत. सरकार सतर्क आहे. दोषी आढळणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.