कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये अर्चना पूरण सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू विशेष न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. अर्चना आणि सिद्धू दोघेही जजच्या खुर्चीवर बसून कपिल शर्मा शोची मजा द्विगुणित करत आलेत. एकीकडे सिद्धू आणि कपिल वर्षानुवर्षे एकत्र आहेत, तर अर्चनाही कपिलच्या करिअरचा महत्त्वाचा भाग आहे. पण जेव्हापासून अर्चनाला कपिलच्या शोमध्ये जजची खुर्ची मिळाली तेव्हापासून शोचे कॉमेडियन आणि चाहते तिला सिद्धूच्या नावाने चिडवत आहेत. पण आता पंजाब निवडणूक 2022 चे निकाल पाहता सिद्धू लवकरच शोमध्ये परत येऊ शकतो असे ट्विटर वापरकर्ते म्हणत आहेत.
अर्चनाची खुर्ची धोक्यात
नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते 2022 च्या पंजाब विधानसभेच्या निवडणुकीतही उभे राहिले. मात्र, आता सिद्धूच्या स्वप्नांचा चुराडा होताना दिसत आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्ष प्रचंड बहुमताने आघाडीवर आहे. केजरीवाल यांच्या पक्षाने सीएम चन्नी, कॅप्टन अमरिंदर सिंग, प्रकाश सिंग यांच्यासह नवज्योत सिंग सिद्धू यांचा पराभव केला आहे. अशा परिस्थितीत सिद्धू आणि अर्चना यांच्यावर बरेच मीम बनवले जात आहेत. ट्विटरवरही मीम्स जोरदार व्हायरल झाले आहेत.
https://twitter.com/kamaalrkhan/status/1501838932891287553
Should Archana Puran Singh be worried about losing her job??? https://t.co/Oz3pFOzNTN
— Raju Das (@rajudasonline) March 10, 2022
Exclusive pictures of #ArchanaPuranSingh after #Siddhu loss.#PunjabElections2022
🤣😂😜 pic.twitter.com/mhr7gpNL2W— Suyash (@suyashchamoli) March 10, 2022
https://twitter.com/JamKisan1/status/1501776795623960578
Archana Puran Singh is upset. @sherryontopp is coming back to the #KapilSharmaShow. @KapilSharmaK9 @BeingSalmanKhan #PunjabElections2022 #ElectionResults #ArchanaPuranSingh pic.twitter.com/qGKeOrfh1e
— Niranjan (@Niranjan__Dalvi) March 10, 2022
अर्चना पूरण सिंगसाठी ही कठीण आणि अडचणीची वेळ असल्याचे ट्विटर वापरकर्त्यांचे म्हणणे आहे, कारण आता तिची द कपिल शर्मा शोची खुर्ची हिसकावून घेतली जाणार आहे. निवडणूक हरल्यानंतर सिद्धू कपिल शर्मा शोमध्ये परतणार असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे.
नवज्योत सिंग सिद्धू हे कपिल शर्माच्या कॉमेडी नाईट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शोचे जज आहेत. सिद्धू त्यांच्या कविता आणि हास्यासाठी ओळखले जात होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी कपिलचा शो सोडला होता आणि त्यांच्या जागी अर्चना पूरण सिंह आली होती.