पुणे – ‘बाई पण देगा देवा’ या गाण्यावर महिलांनी ठेका धरून पुणे बिजनेस क्लब व सयोग वेंचर्सचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा रविवारी (दि. 25) मोठ्या जल्लोषात आणि दिमखदार पद्धतीने पार पडला.
खास महिला उद्योजकांसाठी कार्यरत असलेले आणि महिला उद्योजकांच्या व्यवसाय वाढीचे एक अग्रगण्य व्यासपीठ म्हणजे पुणे बिजनेस क्लब, सयोग वेंचर्स. स्वतःच्या हिंमतीवर आपल्या व्यवसायात भरारी घेऊन ईतर महिलांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी मदत करून एक आदर्श निर्माण केलेल्या 60 महिलांच्या पाठीवर “पुणेरत्न’ पुरस्काराने कौतुकाची थाप दिली.
यावेळी द बिजनेस मॅगझिन’ या मासिकाचे अनावरण देखील थाटामाटात करण्यात आले. आकांक्षा ज्वेलर्सच्या संस्थापिका अनिता क्षीरसागर, फ्लेवर्स स्ट्रीटच्या संस्थापिका अलमास कुची, व्हायब्रंट ग्रुप ऑफ कंपनीजच्या संस्थापिका अध्यक्षा अश्विनी जाधव, गिफ्ट्स अवेन्यूचे संस्थापक अभिजीत बोरा, इनरव्हील क्लब ऑफ पुणे अपटाऊनच्या प्रेसिडेंट सुषमा कोंडे, सॅमव्हिल पावरचे संचालक सचिन चोरडिया यांच्या हस्ते महिलांना “पुणेरत्न’ पुरस्काराने गौरवण्यात आले.
श्वेता मंत्री यांना शैक्षणिक क्षेत्रात “बिझनेस आयकॉन ऑफ पुणे’ हा पुरस्कार देण्यात आला.एलोवेरा स्कूलच्या विक्री वितरण व्यवस्थापक सविता पाटील व आर. पी. टी. एस.च्या संस्थापिका रश्मी देशमुख पापळकर यांनी व्यवसाय वृद्धीसाठीचा कानमंत्र दिला. पुरस्कार सोहळ्याचे यशस्वी नियोजन क्लबच्या संस्थापक अध्यक्षा सपना काकडे आणि त्यांच्या ग्रुपने केले.
पुरस्कारार्थी रणरागिणी
स्मिता जैन, निशिगंधा मुजुमदार, कंचन सरडा, श्वेता सोनार, गौरी कुंभार, राजश्री दाहोत्रे, हेमांगी मेहता शहा, तरन्नुम मुळे, मनीषा गोंधळे, दीपिका जैन, वर्षा ताडवलकर, सोनल जैन, एकता राठोड, बॉस्की जैन,मनाली दीक्षित, नमिता छत्रे, प्रियांका घोलप, कृष्णा व्यास, नीलांबिका बसवराज, सायली सुरे, पुनम सस्ते, धनश्री जालनापुरे, जानवी भिडे, नेहा सगट, प्रांजल नहाटा, तबस्सुम शेख, सुदीपा चौधरी, अश्विनी हिंगमिरे, अंजली इथपे, स्वाती माहेश्वरी, पुनम चोरडिया, रिहीता रंजन, रामेश्वरी वैशंपयन, स्नेहल परदेसी, नीलिमा अमित, दिपाली नाकर, गीतांजली कडते, सोनल माहेश्वरी, भाग्यश्री पवार, दिपिका ओसवाल, वैशाली बलदोटा, काजल जाधव, कल्याणी शिंदे, वैशाली मोरे, डॉक्टर श्रद्धा धर्माधिकारी, मोनिका मारू, डॉक्टर रेणुका गव्हाळे, उर्वी श्रॉफ, योगिता वरगडे, अरुंधती वर्मा, प्रीती बेलसरे, तृप्ती रकाटे, शुभदा शिंदे, सोनल शहा, डॉ. दीप्ती वाघमारे, इशा रावल, शीतल गोळे पवार, अश्विनी कुलकर्णी, निवेदिता देशपांडे, प्रतीक्षा कुदळे, अमोल ढवळे, विनोद मावस आणि वृषाली वांजळे.