पुणे -सहकारनगर पोलिसांनी सापळा रचून दुचाकी चोरास जेरबंद केले. त्याच्या ताब्यातून तीन दुचाकी हस्तगत केल्या. शुभम विलास भगत (20, रा. धनकवडी) असे आरोपीचे नाव आहे.
गस्तीवरील पोलीस पथकास भगत चोरीची मोटर सायकल विक्री करण्यासाठी धनकवडी स्मशानभूमीच्या पाठीमागील गेटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. ही कारवाई सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी, उपनिरीक्षक सुधीर घाडगे, हवालदार बापू खुटवड, पोलीस नाईक भुजंग इंगळे, सुशांत फरांदे, महादेव नाळे, शिपाई महेश मंडलिक, सागर सुटकर, सागर शिंदे, शिवलाल शिंदे व प्रदीप बेडिस्कर यांच्या पथकाने केली.