पुणे(प्रतिनिधी) : महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयात आज जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. या निमित्त जम्बो मधील डॉक्टर आणि परिचारिकांनी “आरोग्य दुर्गा ” चे रूप घेत हा दिन साजरा केला. करानोच्या लढयात परिचारिका गेल्या वर्षभरापासून लढत असून आज त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
दरम्यान, आज जगावर कोरोनाचं संकट असताना असंख्य परिचारिका भगिनी देवदूत बनून रुग्णांची सेवा करत आहेत. उपचारांच्या बरोबरीनं रुग्णांना धीर, विश्वास, आत्मबळ देत आहेत.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत याच परिचारिकांची भूमिका मुख्य असून या लढाईत त्याच मुख्य सैनिक आहेत. स्वत:च्या जीवाची जोखीम पत्करुन, कुटुंबाचा विचार बाजूला ठेवून असंख्य परिचारिका भगिनी आज दिवसरात्र रुग्णसेवा करीत आहेत.