पुणे – महापालिकेकडून होळकर तसेच वडगाव जलकेंद्राअंतर्गत विद्युत तसेच देखभाल दुरुस्तीविषयक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.10) रोजी वडगाव जलकेंद्र तसेच होळकर जलकेंद्रांअंतर्गत केला जाणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यात सिंहगड रस्ता, कात्रजचा काही भाग तसेच येरवडा परिसरातील काही भागाचा पाणीपुरवठा बंद असेल, असे मनपा पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.
पाणी बंद असणारा भाग
वडगाव जलकेंद्र परिसर- हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी. जुने होळकर जलकेंद्र – एच.ई. फॅक्टरी व एम.ई.एस.
नवीन होळकर जलकेंद्र : मुळा रस्ता, संपूर्ण खडकी परिसर, ऍम्युनेशन फॅक्टरी, हरिगंगा टाकीवरील संपूर्ण परिसर, हरिगंगा सोसायटी, राम सोसायटी, फुलेनगर, इंदिरानगर, स्वातंत्र्य सैनिकनगर, आंबेडकरनगर, पोरवाल पार्क, पंचशीलनगर, प्रतीक नगर, मोहनवाडी, कस्तुरबा सोसायटी, श्रमिक वसाहत, जाधव नगर, मेंटल हॉस्पिटल वसाहत, मोक्षेनगर, राजकपूर सोसायटी, माजी सैनिक नगर आदी क्षेत्रांतील भागाचा पाणीपुरवठा बंद असेल.