पुणे : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवन येथे वाघोलीचे माजी उपसरपंच संदिप सातव यांनी भेट घेऊन वाघोलीत वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून गुन्हेगारी व कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने वाघोली नवीन पोलीस स्टेशनला मंजूरी देण्यात आली आहे. तातडीने पोलीस ठाणे कार्यान्वित करण्याची मागणी संदीप सातव यांनी निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
याबाबत माजी उपसरपंच संदीप सातव यांनी सांगितले की, वाघोली उपनगरांत वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून व वाढत्या गुन्हेगारी याचा विचार करून वाघोली पोलीस स्टेशनसाठी पायाभूत सुविधा, त्यासाठी अपेक्षित खर्चाची तरतूद आणि पोलिस ठाण्यांची रचना, हद्द,मनुष्यबळ,वाहने तरतूद करण्याची मागणी नामदार देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे करण्यात आली असून लवकर स्वतंत्र वाघोली पोलीस स्टेशन होईल असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी संदीप सातव व केसनंदचे सरपंच दत्तात्रय हरगुडे यांना दिले आहे. यावेळी केसनंदचे सरपंच दत्ता हरगुडे यांनी केसनंद गावच्या विविध विकास कामांचे निवेदन देऊन उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा देखील केली