पुणे – करोना प्रतिबंधक लसीचे गुरूवारी केवळ कोवॅक्सिन डोस उपलब्ध करून देण्यात आले असून, 11 केंद्रांवर ते मिळणार आहेत. या प्रत्येक केंद्रांवर प्रत्येकी 200 डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
18 वर्षांवरील सर्व नागरिकांना गुरूवारी कोवॅक्सिनचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्यातील 15 टक्के लस ही ऑनलाइन बुकिंग करून, तर 15 टक्के ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल.
याशिवाय 5 ऑगस्टला कोवॅक्सिनचा पहिला डोस ज्यांनी घेतला आहे, त्या 18 वर्षांवरील नागरिकांना गुरूवारी 35 टक्के लस ऑनलाइन बुकिंगद्वारे तर 35 टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून मिळेल. दिव्यांग आणि गरोदर महिलांनाही ऑन दी स्पॉट नोंदणी करून प्राधान्याने पहिला आणि दुसरा डोस दिला जाणार आहे.
याशिवाय शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवल्यास “ऑन दि स्पॉट’ लस मिळणार आहे, असे मनपा आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले आहे.
- कोवॅक्सिनचे डोस मिळण्याची केंद्र
- औंध – औंध कुटी रुग्णालय
- वानवडी – कै. नामदेवराव शिवरकर दवाखाना
- नगररस्ता – कै. दामोदर रावजी गलांडेपाटील दवाखाना
- मंगळवारपेठ – कमला नेहरू रुग्णालय
- ताडीवाला रस्ता – डॉ. नायडू सांसर्गिंग रुग्णालय
- येरवडा- राजीव गांधी रुग्णालय
- कोथरूड- कै. जयाबाई सुतार दवाखाना
- कर्वेनगर- कै. बिंदूमाधव ठाकरे दवाखाना
- गाडीखाना- कै. मालती काची दवाखाना
- महंमदवाडी- कै. दशरथ भानगिरे दवाखाना
- ससून सर्वोपचार रुग्णालय