‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट….’ भाजप नेत्याची जहरी टिका

प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाचा ट्विट करत घेतला खरपूस समाचार

मुंबई –  नारारयण राणे यांना झालेल्या अटकेनंतर राज्य आणि केंद्र सरकारमधील संबंध ताणले गेले असतानाच राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतले. देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये चयुर्वेदी यांच्या नावाच अद्याप कोणताही उल्लेख नव्हता. त्यानंतर चतुर्वेदी-देशमुख कुटुंबियांनी त्यांचे अपहरण झाल्याची फिर्याद नोंदवली आहे.

वरळी येथील सुखदा इमारतीमध्ये गौरव चतुर्वेदी आले होते. तेथून ते बाहेर पडले असता त्यांना वरळी सी लिंक परिसरात सीबीआयने ताब्यात घेतले. देशमुख यांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतले. एकूण 10 जणांच्या पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार गौरव चतुर्वेदी हे देशमुख यांच्या वरळी इथल्या सुखदा इमारत येथे आले होते.

तिथून बाहेर पडल्यानंतर वरळी परिसरातच सी-लिंक जवळ त्यांची गाडी थांबवून त्यांना ताब्यात घेण्यात आले. चतुर्वेदी यांच्यासह देशमुखांच्या वकिलांनाही सीबीआयने ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.

अनिल देशमुखांचा जावई सीबीआयच्या ताब्यात; देशमुख कुटुंबियांकडून अपहरण झाल्याची फिर्याद

यावरून विरोधी पक्षात आणि मविआ सरकारच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक दिसून आली. यातच  भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपाचा ट्विट करत खरपूस समाचार घेतला आहे.

काय म्हणाले  प्रविण दरेकर

 ‘अनिल देशमुखांच्या जावयाला कायदेशीररित्या चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर कुठलीही माहिती नातेवाईकांना दिली नाही, असा आरोप नवाब मलिक तुम्ही करता…’ 

ते पुढे म्हणाले,’ पण ज्यावेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे साहेबांना अटक वॉरंट न दाखवता तुम्ही अटक केली, त्यावेळी कुठे गेला होता कायदा? नवाब मलिकजी, आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कार्ट….

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.