पुणे – शहरात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे नदीला पाणी वाढले आहे. त्यातच पुण्यातील मुठा नदीपात्रात दोन मुले वाहून गेल्याची घटना समोर येत आहे.
घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ओकार तुपधर (वय 17) आणि सौरभ कांबळे (वय 20) अशी दोघांची नावे असल्याचे कळते. दोघेही ताडीवाला रोड येथील रहिवासी आहेत.