पुणे – जेष्ठ साहित्यीक व पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने एक अभ्यासू व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत काही काळ काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझं भाग्य समजतो.
पुणे पोलिसांनी आयोजित केलेल्या एका रक्तदान शिबिरात ते प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. तेव्हा त्यांच्याशी जवळून संवाद साधता आला. दिवंगत बाबासाहेबांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्यासह पुणे पोलीस दल पुरंदरे कुटुंबाच्या दुःखात सहभागी आहेत. अशा शब्दांत पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करुन भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.