पुणे – करोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत बुधवारी फक्त कोविशील्डचेच डोस दिले जाणार असून, 186 केंद्रांवर त्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रत्येक केंद्रांवर 225 डोसचे नियोजन करण्यात आले आहे. 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोविशील्डचा जो पहिला डोस मिळणार आहे, त्याच्या ऑनलाइन बुकिंगची टक्केवारी 15 टक्के असून, ऑन दी स्पॉट बुकिंगही 15 टक्के आहे.
तसेच दि.23 जूनपूर्वी पहिला डोस घेतलेल्या 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना बुधवारी जी लस मिळणार आहे, त्याचे ऑनलाइन बुकिंग 35, तर 35 टक्के ऑन दी स्पॉट बुकिंग होणार आहे.