तालिबान्यांच्या हाती लागलं घबाड; अमरुल्ला सालेह यांच्या घरातील संपत्ती मोजता मोजता आले नाकीनऊ

काबूल :  अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर तालिबानला पंजशीरमधून मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.  मागच्या आठवड्यात तिथेदेखील तालिबानने आपला झेंडा फडकावला आहे. दरम्यान, पंजशीरमधून तालिबानला विरोध करणारे   माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह यांच्या घरातून माेठा खजिना हाती लागला आहे.

तालिबान्यांना सालेह यांच्या घरातून काेट्यवधी डाॅलर्स आणि साेन्याची बिस्किटे सापडली आहेत. नाेटा माेजताना तालिबान्यांना घाम फुटला. यासंबंधी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

तालिबानच्या मल्टिमीडिया शाखेचा प्रमुख अहमदुल्ला मुत्तकी याने ट्विटरवर याबाबत एक व्हिडिओ पाेस्ट केला. सालेह यांच्या घरावर छापा मारल्याचा दावा त्याने केला आहे.  सालेह यांच्या घरातून तालिबान्यांना तब्बल ६५ लाख डाॅलर्स, १८ साेन्याची बिस्किटे, माेठ्या प्रमाणावर दागिनेही हाती लागले.  एवढी संपत्ती मोजता मोजता त्यांच्या नाकी नऊ आले होते.

तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्याच्या महिनाभरानंतर अनेक शहरांमध्ये भीषण चित्र दिसू लागले आहे. उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद असल्याने दाेन वेळच्या जेवणासाठी लाेकांवर अक्षरश: घरातील वस्तू विकायची वेळ आली आहे. काबूलमध्ये चमन-ए-हाेजाेरी नावाचा एक बाजार आहे. तिथे लाेक घरातील भांडी, पंखे, साेफासेट इत्यादी वस्तू विकण्यासाठी घेऊन येत असल्याचे भयानक चित्र पाहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.