पुणे – यंदाही विज्ञान शाखा ‘टॉपर’

कला शाखेचा सर्वात कमी निकाल

पुणे – इयत्ता बारावीच्या परीक्षेत सर्वच शाखांच्या निकालात घट झाली आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाची विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक, तर कला शाखेचा निकाल सर्वांत कमी लागला आहे.

विद्यार्थ्यांना प्रामुख्याने विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवसाय अभ्यासक्रम या पैकी कोणत्याही एका शाखेतून प्रवेश घेता येतो. गतवर्षी विज्ञान शाखेचा निकाल 95.85 टक्के लागला होता. यंदा त्यात 3.25 टक्‍क्‍याने घट झाली आहे. कला शाखेचा निकाल 78.93 टक्के लागला होता. त्यात आता 2.48 टक्‍क्‍याने घट झाली आहे. वाणिज्य शाखेत 89.50 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यात आता 1.22 टक्‍क्‍याने कमी निकाल लागला आहे. व्यवसाय अभ्यासक्रमासाठी 82.18 टक्के निकाल लागला होता. त्यात 3.25 टक्‍क्‍याने घट झाली आहे.

खासगीरित्या प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 49 हजार 748 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 63.67 इतकी आहे. पुनर्परिक्षार्थींसाठी 68 हजार 45 विद्यार्थ्यांची नोंद झाली होती. त्यातील 67 हजार 901 विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून 18 हजार 31 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यांचा एकूण निकाल 26.55 टक्के एवढा लागला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.