रामराजेंनी मागितली होती भाजपकडे उमेदवारी

आ.जयकुमार गोरेंचा गौप्यस्फोट: येळगावकरांवर कडवी टिका

सातारा – विधानपरिषदेचे सभापती रामराजे ना.निंबाळकर यांनी भाजपकडे माढ्यातून उमेदवारीची मागणी केली होती, असा गौप्यस्फोट कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी केला. दरम्यान, येळगावकरांनी केलेल्या आरोपावर आपण प्रतिक्रिया देणार नसून त्यांची पात्रता माझ्या बुटा जवळ आहे, अशा शेलक्‍या शब्दात आ.गोरे यांनी प्रहार केला.

शासकीय विश्रामगृह येथे आ.गोरे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. यावेळी बोलताना आ.गोरे म्हणाले, रणजितसिंह ना.निंबाळकर यांना जेव्हा भाजपची उमेदवारी निश्‍चित होत असल्याचे पाहून रामराजे ना.निंबाळकर यांनी भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. उमेदवारीसाठी तीन आमदारांचा भाजप प्रवेश घडवून आणण्यासह माढ्यासह साताऱ्याची ही जागा निवडून आणण्याचा शब्द दिला होता. त्याबाबत लोणावळा येथे एकत्रित बैठक देखील होणार होती, असे देखील आ.गोरे यांनी सांगितले.

रामराजेंच्या राजकीय कारर्किदीचा अस्त होण्यास सुरूवात झाली असून लोकसभेपाठोपाठ फलटणमध्ये काय होते ते तुम्ही पहाल, असे देखील आ.गोरे यांनी पत्रकारांना सांगितले. त्याचबरोबर रणजितसिंह ना.निंबाळकर यांनी ना.रामराजेंवर केलेल्या टिकेचे आ.गोरे यांनी समर्थन केले. रणजितसिंह यांनी टिका करण्यापुर्वी रामराजेंनी आपल्या भाषणातून काय टिका केली होती, हे लोकांच्या समोर आले नाही. रणजितसिंहानी केवळ निवडणूकीत होती म्हणून त्यावेळी संयम दाखविला, असे आ.गोरे यांनी सांगितले.

दरम्यान, येळगावकर यांनी केलेल्या टिकेला उत्तर देणे आ.गोरे यांनी टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, येळगावकरांची पात्रता आपल्या बुटाजवळ असल्याचे सांगून अकलूजच्या सभेला ते किती गाड्या नेवू शकले, याचा पाढा आ.गोरे यांनी वाचला. त्याचबरोबर लोकसभा निवडणूकीत येळगावकर यांना त्यांच्या मायणी गावात सुध्दा पोलींग एजंटचा फॉर्म मिळू शकला नाही, ह्यावरून त्या माणसाची किती विश्‍वासहर्ता आहे हे स्पष्ट होते. असा टोला देखील आ.गोरे यांनी लगावला. यावेळी कॉंग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे,जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)