तालुक्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर – आमदार बाळा भेगडे
वडगाव मावळ – मावळ तालुक्यातील गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या कामांसाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली. आमदार भेगडे यांनी शासनाकडे मागणी केलेली होती. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन ग्रामपंचायत आणि पंचायतराज विभागच्या शासन निर्णयान्वये मावळ तालुक्यासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
यामध्ये प्रामुख्याने मावळ तालुक्यातील रस्त्यांची कामे घेण्यात आलेले आहेत. या कामांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा काढण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे आदेश आमदार बाळा भेगडे यांनी संबंधित यंत्रणेला दिलेले असून, लवकर या कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.
विकास कामांची माहिती खालीलप्रमाणे. (विकास काम आणि मंजूर निधी या प्रमाणे) : कुसगाव बुद्रुक अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : 40 लाख रुपये, मौजे देहूगाव अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : 40 लाख रुपये, मौजे देहूरोड अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 30 लाख रुपये, मौजे करुंज अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे : 30 लाख रुपये, मौजे किन्हई ते शेलारवाडी रस्ता करणे : 25 लाख रुपये, गहुंजे-साईनगर अंतर्गत रस्ता व बंदिस्त गटारे करणे. (गजानन सोसायटी) : 25 लाख रुपये, मौजे कान्हेगाव अंतर्गत रस्ता कॉंक्रीटीकरण करणे 10 लाख रुपये.