पुणे -लसीकरणाचा वेग अजूनही कमीच असून, जिल्ह्यात दिवसभरात 35 हजार 457 जणांनाच लस देण्यात आली. शहराच्या आसपासच्या भागात 12 हजार 962 जणांना लस देण्यात आली. 12 हजार 660 लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. 102 टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
पुणे महापालिका हद्दीत 80 टक्केच उद्दिष्ट पूर्ण झाले असून, ठरवलेल्या 19 हजार 400 लसीकरणाऐवजी 15 हजार 586 जणांनाच लस देण्यात आली.
पिंपरी-चिंचवड हद्दीमध्ये 6 हजार 909 जणांना लस देण्यात आली. 6 हजार 160 चे उद्दिष्ट ठरवले होते.
जिल्ह्याने दररोज एक लाख लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवले होते, मात्र लसींची उपलब्धता नसल्याने हे उद्दिष्ट सध्यातरी पूर्ण होणे शक्य नाही. मात्र, असे असतानाही 50 हजारांचे उद्दिष्ट अद्याप पूर्ण होऊ शकत नाही, हे आकडेवारीवरून स्पष्ट होते. Pune: The pace of vaccination is still low