वाघोली : महावितरण कार्यालयातील कर्मचारी सचिन नाकतोडे यांचे कोरोनामुळे निधन झाले असल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून वाघोली येथील मॅजेस्टिक सिटी सोसायटीच्यावतीने नाकतोडे यांच्या पत्नी रश्मी नाकतोडे यांना आर्थिक मदत करण्यात आली असल्याची माहिती पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संजय सातव पाटील यांनी सांगितले.
वाघोलीचे सहाय्यक अभियंता गणेश श्रीखंडे यांच्या माध्यमातून एकूण ७६ हजार रुपयांची रक्कम मॅजेस्टिक सिटीचे चेअरमन संजय सातव पाटील व सोसायटी धारकांच्या उपस्थितीत रश्मी नाकतोडे यांना देण्यात आली.
यावेळी सोसायटीचे चेअरमन संजय सातव पाटील यांनी नाकतोडे या कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांना जास्तीत आर्थिक मदत करून नागरिक, सामाजिक संस्था, दानशूर मंडळी यांनी सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन केले आहे.