पुणे – राज्यातील नागरिकांसाठी १०८ रुग्णवाहिका जीवनदायिनी ठरत आहे. अॅडव्हान्स लाइफ सपोर्ट, बेसिक लाइफ सपोर्ट व बाईक अँम्ब्युलन्स या प्रकारात ही सेवा पुरवली जाते. या सेवेत नवजात बालकांसाठी विशेष रुग्णवाहिका व बोट अँम्ब्युलन्स नव्याने समावेश करण्यात आला आहे.
पुण्यातील भारत विकास गृप (बीव्हीजी) या कंपनीद्वारे १०८ रुग्णवाहिकेची सेवा पुरवली जाते. गेल्या १० वर्षात राज्यातील करोडो नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला आहे. समुद्र, व नद्यांमध्ये बुडून मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेता, नव्याने ३६ बोट अँम्ब्युलन्स विविध अपघाती समुद्र किनारे व नदी पात्रांमध्ये तैनात होणार आहे. त्याचबरोबर नवजात शिशूंसाठी २५ रुग्णवाहिका नव्याने येणार आहेत.
रुग्णवाहिकेची संख्या वाढल्याने १०८ क्रमांकावर कॉल केल्यानंतर रुग्ण वाहिकेचा प्रतिसाद देण्याची वेळ कमी होणार आहे. विशेष बाब म्हणजे जलदगतीने अँम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचणार आहे. दहा वर्षांपूर्वी १०८ रुग्णवाहिका सुरु करण्यासाठी निविदा काढली होती. त्याचा सर्व भांडवली खर्च शासनाच्या वतीने करण्यात आला होता. नविन निविदेनुसार ५१ टक्के भांडवली खर्च सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थेला करावा लागणार आहे. त्यामुळे सदर निविदा १० वर्षांसाठी काढण्यात आली आहे.
सद्यस्थितीत रुग्णवाहिकांची संख्या…
अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट : २३३ , बेसिक लाईफ सपोर्ट : ७०४, बाईक अँम्ब्युलन्स : ३३
नव्याने वाढणाऱ्या रुग्णवाहिकांची संख्या
अॅडव्हान्स लाईफ सपोर्ट : २२, बेसिक लाईफ सपोर्ट : ५७०, बाईक अँम्ब्युलन्स : १६३, नवजात शिशुंसाठी रुग्णवाहिका : २५, बोट अँब्युलन्स : ३६